Citypedia News कसे असावे, हे ठरविण्यासाठी बैठक

आपल्याला ‘सिटीपीडिया’ आणि ‘सिटीपीडिया न्यूज’चा एक समुदाय, जमात, चाहता वर्ग तयार करायचा आहे. त्यासाठी आपण ठाण्यात एक विशेष बैठक आयोजित करीत आहोत. त्यासाठी हे खास निमंत्रण. सिटीपीडिया न्यूज म्हणजे महाराष्ट्राचा सद्यकालीन शहरनामा. महाराष्ट्रातील वाढत्या शहरीकरणाचा आणित्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न ‘सिटीपीडिया न्यूज’मधून केला जाणार आहे.

महाराष्ट्रात अनेक महाकाय शहरे आहेत, लहानमोठी शहरे आहेत. शहरीकरणाची प्रक्रिया अगदी मागासलेल्या ग्रामीण भागांत, गावोगावीही पोहोचली आहे. शहरीकरण आपल्यारोजच्या आयुष्यात कळत नकळत स्पर्श करत असते. शहरीकरणाची प्रक्रिया अनेक पदरी असते: जसे लोकसंस्कृती, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, पर्यावरण, स्वच्छता, निवारा, शहरनियोजन वगैरे वगैरे. या सर्वाचा वेध आणि दखल सिटीपीडिया न्यूजमध्ये घेण्यात येईल.

सिटीपीडिया न्यूज हे ‘मतदाता  जागरण अभियान’ या नागरिक चळवळीची ई-पत्रिका असेल. 

सिटीपीडिया न्यूजसाठी सगळेच विषय महत्त्वाचे आहेत. तरी देखील तीन क्षेत्रांवर आम्ही भर देण्याचे ठरवले आहे. पर्यावरण, निवारा आणि जनसंस्कृती. सिटीपीडिया न्यूजचे वितरण प्रामुख्याने ऑनलाईन होईल. शिवाय त्याची प्रिंट आवृत्ती देखील काढण्यात येईल.

मूळ सिटीपीडिया प्रकल्प आहे तरी काय? तो सोशल नेटवर्किंगचा सर्वोत्कृष्ट लोकाभिमूख प्रकार आहे. विकिपीडिया हा आपला आदर्श आहे. विकी या सॉफ्टवेअरवर विकिपीडियाआधारित आहे, तोच आधार आपण सिटीपीडियासाठी घेतला आहे. सिटीपीडिया हा शहरीकरण, समस्या, उपाय आणि संघटना यांचा मुक्त ज्ञानकोश असेल. ते शहरांच्या प्रश्नांचे खुलेव्यासपीठ आहे. सिटीपीडियात प्रामुख्याने शहरे, शहरातील प्रश्न, शहरातील लोकांच्या समस्या, प्रशासन, लोकचळवळ अशा शहराच्या संबंधित गोष्टींची चर्चा असेल. वाढत्याशहरीकरणामुळे प्रचंड प्रमाणात अस्वस्थता वाढत आहे, प्रश्नांची भीषणता वाढत आहे. या शहरात राहणाऱ्या सामान्य माणसाला सकाळसंध्याकाळ अनंत अडचणींचा सामना करावालागत आहे. शहरीकरणातून समस्या वाढत आहेत.

“आमच्या शहरावर आमचा अधिकार” असे म्हणत मुंबईला खेटून असणाऱ्या ठाणे शहर, या शहरातील वेगवेगळ्या विचारधारेत काम करणारे सजग कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनीह्या अधिकारासाठी संवाद, संघर्ष आणि संघटन करीत लोकचळवळीचा मार्ग पत्करला, त्यातून जन्म झाला “ठाणे मतदाता जागरण अभियान” या संघटनेचा. सिटीपीडिया ही याचळवळीतून, कामातून पुढे आलेली संकल्पना आहे. सिटीपेडिया या माध्यमातून आपण शहरातील प्रश्नांचा मागोवा घेणार आहोत, शहरातील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण करणार आहोत, शहरातील लढाईला एक दिशा देणार आहोत. सिटीपेडिया मध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद तसेच अन्य शहरातील कार्यकर्ते आपले लिखाण करीत हा संदर्भ ग्रंथ परिपूर्णकरीत जातील आणि त्यातून सिटीपेडिया बनेल एक मोठा शहरीकरणाचा दस्तावेज.

‘सिटीपीडिया न्यूज’ हे ‘सिटीपीडिया’ वेब पोर्टलचे प्रतिनिधित्व करेल. ते सिटीपीडियाचे वृत्तपत्रीय अंग असेल. ‘सिटीपीडिया न्यूज’चे स्वरूप साधारणपणे असे असेल: संपादकीय, एकदोन लेख, महाराष्ट्रातील शहरीकरणाशी संबंधित बातम्या, फोटो, व्हिडीओ फीचर्स, मुलाखती वगैरे वगैरे. ‘सिटीपीडिया न्यूज’ मघ्ये महाराष्ट्रातील शहरविषयक बातम्यांचे असे संकलनअसेल जे वृत्तपत्रांच्या शहर पुरवण्यावरून उधृत केलेले असेल आणि जे आपल्याला त्या त्या प्रश्नांवर विचार करायला लावेल. त्यावर चर्चा करता येईल, व्यक्त होता येईल. सिटीपीडियातअसणारे सर्वच विषय: म्हणजे जसे लोकसंस्कृती, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, पर्यावरण, स्वच्छता, निवारा, शहर नियोजन वगैरे वगैरे येथे वृत्त स्वरूपात मिळतील. शिवाय लेख असतील.अपेक्षित हे आहे की यात सर्वांनी व्यापक प्रमाणात भाग घ्यावा आणि आपल्या आपल्या शहरविषयक समस्यांसाठीचे हे व्यासपीठ बनवावे. हल्ली सिटीझन जर्नलिझम ही कल्पना प्रिंटमीडिया आणि चॅनेल दोन्हींवर लोकप्रिय झाली आहे. त्याची ही अधिक प्रभावी, पण खूप पुढची आवृत्ती आहे असे म्हणता येईल.

आता एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ज्यामुळे या बैठकीचे प्रयोजन स्पष्ट होईल. त्यातून ज्या अनेक पत्रिका, मासिके, प्रकाशने चालतात त्यापेक्षा सिटीपीडिया न्यूजचे वेगळेपणअधोरेखित होईल. ते म्हणजे आपल्याला ‘सिटीपीडिया न्यूज’ ही सिटीपीडियन समुदायातर्फे सामुदायिकपणे चालवायची आहे. हा सहभाग अगदी ‘सिटीपीडिया न्यूज’च्या स्वरूपापासूनलेखनापर्यंत, संपादनातर्फे असणार आहे. त्याची योग्य ती नियमावली आणि आचरणसंहिता आपण सर्वानुमते करूच. आपल्या सगळ्यांचा सहभाग यासाठी अत्यावश्यक आहे.

या बैठकीपासूनच त्याची सुरुवात होणार आहे. ही बैठक ठाण्यात होणार असल्याने असेक जण इच्छा असून उपस्थित राहू शकणार नाहीत. तरी देखील तुमची मते, सहभागआमच्यासाठी तेवढाच मोलाचा असणार आहे. आणि तो आम्ही तेवढाच गांभीर्याने घेऊ.  ते त्यांची मते, सूचना आम्हाला जरूर कळवू शकतात.  नमुना अंक वाचण्यासाठी इथे क्लिक करा

बैठकीचे वेळ आणि स्थळ : शनिवार, २५ ऑगस्ट २०१८. संध्या ४.३० वा ठाणे येथे.

आपल्याला येण्याची इच्छा असेल तर अनिल शाळीग्राम (९९३०६ ०६९५२) यांना संपर्क करा

आपले स्नेहांकित

संजीव साने, अनिल शाळीग्राम, उन्मेश बागवे

Print Friendly, PDF & Email

Author: admin