दूषित पाणी आयुक्तांना भेट : औरंगाबाद

शहरातील अनेक भागांमध्ये नळाला दूषित पाणी येत असून, सोमवारी (ता. सहा) झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी दूषित काळे पाणी बाटल्यांमध्ये भरून आणून ते महापौर, आयुक्त यांना भेट दिले.

पाणीपुरवठ्याची देखभाल-दुरुस्तीची कामे होत नसल्यामुळे नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. विष्णूनगर वॉर्डाच्या नगरसेविका अंकिता विधाते यांनी दूषित पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. गेल्या अनेक दिवसांपासून वॉर्डात नळाला दूषित पाणी येत असताना अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दुरुस्तीची कामे करण्याची मागणी वारंवार करण्यात आली, असे सांगत त्यांनी बाटलीत आणलेले पाणी महापौर, आयुक्तांना भेट म्हणून दिले. त्यानंतर आत्माराम पवार, मीना गायके यांनीही दूषित पाणी असलेल्या बाटल्या दिल्या. दिलीप थोरात यांनी सर्वच भागांत दूषित पाण्याचा प्रश्न आहे. कंत्राटदार कामे घेण्यास तयार नाहीत, असा आरोप केला. राजेंद्र जंजाळ यांनी देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने पाईप खरेदी करावेत, त्यानंतर कंत्राटदारांकडून कामे करून घ्यावीत, अशी मागणी केली. सुमारे अर्धा तास चर्चा होऊन याप्रकरणी ठोस आदेश देण्यात आले नाहीत.

Print Friendly, PDF & Email

Author: admin