Recent Posts

Posted in Special Story

Citypedia News कसे असावे, हे ठरविण्यासाठी बैठक

आपल्याला ‘सिटीपीडिया’ आणि ‘सिटीपीडिया न्यूज’चा एक समुदाय, जमात, चाहता वर्ग तयार करायचा आहे. त्यासाठी आपण ठाण्यात एक विशेष बैठक आयोजित करीत आहोत. त्यासाठी हे खास निमंत्रण. सिटीपीडिया न्यूज म्हणजे महाराष्ट्राचा सद्यकालीन शहरनामा. महाराष्ट्रातील वाढत्या शहरीकरणाचा आणित्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न ‘सिटीपीडिया न्यूज’मधून केला जाणार आहे. महाराष्ट्रात अनेक महाकाय शहरे आहेत, लहानमोठी शहरे आहेत. शहरीकरणाची प्रक्रिया अगदी मागासलेल्या ग्रामीण भागांत, गावोगावीही पोहोचली आहे. शहरीकरण आपल्यारोजच्या आयुष्यात कळत नकळत स्पर्श करत असते. शहरीकरणाची प्रक्रिया अनेक पदरी असते: जसे लोकसंस्कृती, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, पर्यावरण, स्वच्छता, निवारा, शहरनियोजन वगैरे वगैरे. या सर्वाचा वेध आणि दखल सिटीपीडिया न्यूजमध्ये घेण्यात येईल. सिटीपीडिया न्यूज हे ‘मतदाता  जागरण अभियान’ या नागरिक चळवळीची ई-पत्रिका असेल. 

Continue Reading...
Posted in Admin News

प्लास्टिक बंदी कागदावरच : कोल्हापूर

राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू करून दीड महिना उलटला असला तरी नागरिकांकडून प्लास्टिकचा खुलेआम वापर सुरू आहे. काही ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी प्लास्टिकला पर्याय म्हणून कागदी वस्तूंचा वापर झाला असली तरी महानगरपालिका, जिल्हा परिषद, प्रादेशिक प्रदूषण विभाग, अन्न व औषध प्रशासन या संबंधीत विभागांच्या दुर्लक्षामुळे प्लास्टिक बंदी Read More

Continue Reading...
Posted in Admin News

घनकचरा प्रकल्पाचे काम रखडले : जळगाव

जळगावः शहरातील दैनंदिन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा प्रकल्पाला 30 कोटींचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी 6 कोटी 94 लाखाचा निधी महापालिकेला मिळाला आहे. मात्र प्रकल्पाच्या खरेदीसाठीच्या कामासाठी “ई-निविदा’ प्रक्रियेच्या अहवालात स्पष्ट उल्लेख नसल्याने गेल्या चार महिन्यांपासून काम रखडले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालकांना पत्र पाठवून मार्गदर्शन मागविले आहे. शहरातील Read More

Continue Reading...
Posted in Admin News

नागपूरमध्ये 50 टक्के पाणीकपातीचे संकेत

नागपूर: नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच जलाशयाची स्थिती बघता 50 टक्के पाणीकपातीचे संकेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. नागपूर महापालिकेला या संकटाची वारंवार माहिती देत गळती रोखणे, विहिरी, बोअरवेल स्वच्छतेच्या सूचना दिल्या. परंतु, अशी कुठलीही तयारी नसल्याचे नमूद करीत त्यांनी महापालिकेचे कान टोचले. पेंच जलाशयात केवळ 21 टक्के पाणी असून, पुढील काही दिवसांत पाऊस Read More

Continue Reading...
Posted in Admin News

औरंगाबाद शहरात तीन दिवसांआड पाणी

औरंगाबाद – शहरात गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू आहे. सोमवारी (ता. सहा) झालेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा तीन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी काढले. शहरातील पाणीपुरवठ्यावरून शिवसेना-भाजप युतीमध्ये कलगीतुरा सुरू आहे. भाजप नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनानंतर तत्कालीन आयुक्तांनी संपूर्ण शहराला तीन दिवसांआड पाणी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शिवसेनेने विद्यमान आयुक्तांकडे दोन दिवसांआड Read More

Continue Reading...